लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा
लहान मुलांसाठी श्रीकृष्णाच्या १४ सर्वोत्तम कथा मुलांना गोष्टी सांगताना पालक आणि मुलांमध्ये बंध निर्माण होतो आणि मजेदार व रोमांचक पद्धतीने मुलांमध्ये मूल्यांची जोपासना होते . तुमच्या मुलांना ह्या बाळ कृष्णाच्या कथा नक्कीच आवडतील ! कृष्णाच्या नैतिक कथा हिंदू देवता विष्णूने पृथ्वीवर नऊ अवतार घेतले . त्यापैकी एक अवतार म्हणजे कृष्णावतार . आजही कृष्णाच्या बाळलीला खूप हौसेने सांगितल्या जातात . १ . दैवी भविष्यवाणी अनेक युगांपूर्वी , उग्रसेन नावाचा राजा होता . त्याला दोन अपत्ये होती - मुलगा कंस आणि मुलगी देवकी . देवकी सुस्वभावी होती , परंतु कंस कपटी वृत्तीचा होता . मोठे झाल्यावर कंसाने आपल्या वडिलांना कारागृहात टाकले . दरम्यानच्या काळात , देवकीचे लग्न वासुदेवाशी झाले . जेव्हा कंस त्याच्या बहिणीला सासरी सोडण्यास जात होता तेव्हा आकाशवाणी झाली की " देवकीचा आठवा पुत्र मोठा होऊन तुला ठार करेल ". आपला जीव वाचवण्यासाठी कंसाला आपल्या बहिणीला ठार करायचे होते . परंतु वासुदेवाने त्याच्या बायकोला वाचवण्यासाठी कंस...